Railway News पुणे : फुकट्या प्रवाश्यांना रेल्वेने ( Railways free passengers) चांगलाच धडा शिकवला आहे. पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २८ हजार १६७ लोक (28 thousand 167 people ) विना तिकीट ( without tickets ) प्रवास करताना आढळून आले व त्यांच्याकडून २ कोटी २९ लाख २२ हज़ार रुपये (Rs 2 crore 29 lakh 22 thousand) दंड वसूल करण्यात आला.
तसेच ८५८९ जणांना अनियमित प्रवासासाठी ५० लाख ६९ हज़ार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे , तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २०६ जणांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दु दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे करण्यात आली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!