Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर येथील ठगाकडून शेतकऱ्यांना इम्पोर्ट-एक्स्पोर्टच्या नावाखाली दामदुप्पटीचे गाजर…! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसाहेब कारवाई कधी करणार?

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 5 October 2025, 18:25
A thug from Hadapsar is selling carrots to farmers at double the price in the name of import-export...! When will the Chief Minister and Deputy Chief Minister take action?

AI

लोणी काळभोर, ता. 5: हडपसर (Hadapsar) येथील एका संस्थेने शेतकरी, उद्योजक, महिलावर्ग व सर्वसामान्य नागरिकांना दहा महिन्यात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून 4 हजारहून अधिक कोटींची माया बेकायदा गोळा केली आहे. तर संबंधित संचालकाने त्याच्याकडे 4 हजार 800 कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचा दावा स्वत: व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करून केला आहे. तर सबंधित संस्थेच्या अनधिकृत कारभाराबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार देऊन देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. तर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व आरबीआयने चौकशीसुद्धा केली नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे संबंधित संचालकाचे चांगलेच फावले असून तो घाशा गुंडाळून पळून गेल्यानंतर प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे एका संघटनेनी संबधित संस्थेच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन त्या संस्थेच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी देईल? की या प्रकरणात आपली भूमिका काय मांडेल? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हडपसर (पुणे) येथील एका बोगस संस्थेने नागरिकांना फसवण्यासाठी मार्केटिंगचे एक नवीन षडयंत्र रचले आहे. कंपन्यांनी कमिशनचे लालच देऊन एजंट लोकांच्या नियुक्या केल्या आहे. या संस्थेतील एजंट लोकांनी नवनवीन फंडे वापरून या बोगस योजना राज्यभर राबविल्या आहेत. या मार्केटिंग भूलभुलैय्यामध्ये लाखो गुंतवणूकदार अडकले असून त्यांनी 4 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र या संस्थेच्या कोणत्याही योजना अधिकृत नसून कधीही बंद पडू शकतात. त्यामुळे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक फसवणुकीचा घोटाळा उघड होऊ शकतो.

 

शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना हेरून अल्पावधीत दामदुप्पट व प्रतिमाह 5 हे 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले आहे. शेतकऱ्यांना दहा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचा दावा केला आहे. या अमिषाला महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बळी पडले असून त्यांनी या फसव्या योजनेत हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. संबंधित कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक करून घेतली आहे. मात्र हा पैसा जातो कुठे? अथवा या पैशाचे काय केले जाते? याचा अद्यापपर्यंत कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. परंतु, कंपनीच्या संचालकांची मात्र संपत्ती 4 हजार 800 कोटींहून अधिक रुपयांची झालेली आहे.

दरम्यान, या संस्थेचा फसवणुकीचा हा एक स्कॅम असून संचालक पैसे गुंडाळून कधीही गायब होऊ शकतात. असे जर झाले हजारो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येतील? तर अनेकांचे संसार उध्वस्त होतील. त्यामुळे प्रशासनाने लवकर या संस्थेची चौकशी करून संबंधितावर त्वरित कारवाई करावी. अशी मागणी एकीकडे जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे कारवाई का केली जात नाही? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीच्या संचालकांवर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना इम्पोर्ट-एक्स्पोर्टचे गाजर

हडपसर येथील एका ठगाने शेतकऱ्यांना शेतातील माल इम्पोर्ट-एक्स्पोर्टच्या नावाखाली चांगली किंमत मिळवून देतो. असे म्हणून जादा नफ्याचे आमिष दाखविले आहे. एवढेच नाही तर संबंधित संचालकाने नागरिकांचा विश्वास बसावा म्हणून सर्वांचे करारदेखील करून घेतले आहेत. मात्र या कराराच्या आडून शेतकरी व गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे गाजर दाखवत बेकायदेशीर निधी संकलित करण्याचे काम दलालामार्फत साखळी पध्दतीने संबंधित संस्था करत आहे.

या फसव्या स्किममध्ये हजारो शेतकरी व नागरिकांचा आर्थिक श्वास गुदमरला आहे. या संस्थेला शासनाची कुठलीही अधिकृत परवानगी नसतानादेखील संस्थेने आरबीआयच्या आर्थिक नियमांच्या निकषांना फाट्यावर मारले आहेत. या संस्थेने सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व खाजगी वित्तीय संस्थेच्या नाकावर टिच्चून आर्थिक कलेक्शन ठेवून करोडो रुपये गोळा केले आहेत. त्यामुळे हडपसरमधील या ठगाची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post
Udhhav Thackeray: ...then raise your voice in his ear; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks, why did he say that?

Udhhav Thackeray: ...तर त्याच्या कानाखाली आवाज काढा; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन, असं का म्हणाले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.