Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महामार्गावर पैसे उकळण्याची नवी ‘स्कीम’! ‘तुमचं टायर पंक्चर झालं’ सांगत गाडी गॅरेजवर लावायला लावली अन् नंतर अज्ञात तरुणांनी व्यापाऱ्यासोबत….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 November 2026, 14:29

पुणे : पुण्याकडे प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याला टायर पंक्चर झाल्याचे सांगून आठ हजार रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार खेड शिवापूर परिसरात उघडकीस आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी व्यापाऱ्याच्या कारचे चाक पंक्चर झाल्याचे सांगितले. त्यानंतर पंक्चरच्या दुकानातील आणखी दोघांच्या मदतीने फसवणुकीचा बनाव रचण्यात आला. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरत जिल्ह्यातील कामरेज तालुक्यातील वराचा येथील रहिवासी असलेले व्यापारी डेनेश बिखाभाई भंडेरी (वय ३०) हे चारचाकी वाहनाने पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या कारचे मागील चाक पंक्चर झाल्याचे सांगितले.

दुचाकीस्वारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भंडेरी यांनी जवळच्या पंक्चरच्या दुकानात कार नेली. तेथे आधीच आणखी दोन अनोळखी व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांनी कारचे चारही टायर पंक्चर असल्याचे सांगितले. तसेच टायरमध्ये केमिकल टाकावे लागेल आणि त्यासाठी आठ हजार रुपये खर्च येईल, असे सांगून व्यापाऱ्याला विश्वासात घेतले.

आरोपींनी भंडेरी यांच्याकडून फोन-पेद्वारे आठ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर टायरमध्ये केमिकल टाकल्याचा केवळ बनाव केला. व्यापारी कार घेऊन पुढे निघाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर डेनेश भंडेरी यांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खराडीत इन्स्टाग्राम स्टेटसवरून वाद; दोन तरुणांना बेदम मारहाण! नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:43

वाघोलीतील वकिलाकडून सहा जणांची 24 लाखांची फसवणूक; खरेदीखत करूनही जमिनीचा ताबा नाही!

Friday, 20 November 2026, 13:34

लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत आजीचा पाय फ्रॅक्चर, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:23

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33
Next Post

पुरंदरमध्ये सकाळी रक्तरंजित थरार! कामावर निघालेल्या 47 वर्षीय महिलेची भररस्त्यात निर्घृण हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp