Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराडीत इन्स्टाग्राम स्टेटसवरून वाद; दोन तरुणांना बेदम मारहाण! नऊ जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 November 2026, 13:43

खराडी : इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून झालेल्या वादाचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जन मैदानात नेले. तेथे लाकडी दांडके, धारदार हत्यारे आणि दगडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात बुधवारी (ता. 18 ) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. खराडी पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात संदीप यांगड (वय 21 ) याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून, डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तर त्याचा मित्र सार्थक बंदाटे हाही गंभीर जखमी झाला आहे. तर संकेत वारे, अंकुश जाधव, फैजान शेख, राहुल काष्टेकर, सोहेल नदाफ, करण पवार, ओम गायकवाड, विशाल यादव आणि अर्थव माने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सदिप सुभास यांगड (वय 21 रा. रुम नं 201 तुळजदा भवानी नगर खराडी पुणे) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांगड हा खराडी परिसरात टेम्पो चालविण्याचा व्यवसाय करतो. बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास तो आपलेघर सोसायटी, लेन क्रमांक 14 येथील लक्ष्मी प्रोव्हिजन स्टोअरसमोरील रस्त्यावर मित्र सनी ससाणे आणि संकेत डेंगळे यांच्यासोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी संकेत वारे, अंकुश जाधव, फैजान शेख, राहुल काष्टेकर, सोहेल नदाफ, करण पवार, ओम गायकवाड, विशाल यादव आणि अर्थव माने हे चार दुचाकींवरून तेथे आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके आणि धारदार हत्यारे होती.

यावेळी आरोपींनी सार्थक बंदाटे याला दुचाकीवरून सोबत आणले होते. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला दुखापत होऊन रक्त येत असल्याचे संदीपच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरोपींनी संदीपला उद्देशून, ‘तू काल इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून भांडण करीत होतास ना, तुला आता दाखवतो,’ असे म्हणत जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.

त्यानंतर संदीप आणि सार्थक या दोघांना नगर रस्त्याच्या दिशेने नेऊन महालक्ष्मी लॉन्सच्या कमानीतून आत चुलमटण हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात नेण्यात आले. तेथे सर्वांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडके आणि दगडांनी बेदम मारहाण केल्याने संदीपच्या डोक्याला, भुवईला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. सार्थकच्या डोक्याला आणि चेहऱ्यालाही गंभीर जखमा झाल्या.

दरम्यान, दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच हल्लेखोर दुचाकींवरून पसार झाले. त्यानंतर संदीपचे वडील सुभाष आणि भाऊ अविनाश यांनी त्याला खासगी टेम्पोतून मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तर सार्थकला त्याच्या नातेवाइकांनी बालाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी संदीप यांगड याने दिलेल्या जबाबावरून नऊ जणांविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवरील स्टेटसवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने खराडी परिसरात खळबळ उडाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खराडीत इन्स्टाग्राम स्टेटसवरून वाद; दोन तरुणांना बेदम मारहाण! नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:43

वाघोलीतील वकिलाकडून सहा जणांची 24 लाखांची फसवणूक; खरेदीखत करूनही जमिनीचा ताबा नाही!

Friday, 20 November 2026, 13:34

लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत आजीचा पाय फ्रॅक्चर, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:23

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp