Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिव्यांग पती, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि कर्जाचा डोंगर! संधीचा फायदा घेत पुण्याच्या महिलेला दुबईचं अमिश दाखवलं अन् नको ‘ते’ करायला….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 November 2026, 14:50

पुणे : कुटुंबावरील कर्जाचा डोंगर, पतीचे दिव्यांगत्व आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळे एका महिलेने परदेशात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. याचाच फायदा घेत एका एजंटने तिला दुबईतील हॉटेलमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. दरमहा सव्वा लाख रुपये पगार मिळेल, असे सांगून तिला दुबईला पाठवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर तिची फसवणूक झाल्याचे समोर आले. तिच्यावर देहविक्रीसाठी दबाव टाकण्यात आला. तिने नकार दिल्यानंतर पासपोर्ट हिसकावून तिला एका खोलीत डांबण्यात आले आणि पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. अखेर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून या महिलेची सुखरूप सुटका झाली असून, ती भारतात परतली आहे.

पतीचे दिव्यांगत्व आणि कुटुंबावरील कर्जामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महिलेने परदेशात नोकरी करण्याचे ठरवले होते. याच काळात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तिचा एका एजंटशी संपर्क झाला. त्याने दुबईतील हॉटेलमध्ये नोकरी आणि दरमहा सव्वा लाख रुपये पगार मिळण्याचे आमिष दाखवले. या आश्वासनावर विश्वास ठेवून महिला दुबईला गेली.

मात्र, दुबईत पोहोचल्यानंतर एजंटचा खरा हेतू समोर आला. महिलेवर देहविक्री करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिने त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला आणि तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. तसेच तिच्या सुटकेसाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित महिलेच्या पतीने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर मोहोळ यांनी स्वतः परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधत दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाची मदत मागितली.

महिलेचे ठिकाण शोधून तिच्याशी संपर्क कायम ठेवण्यात आला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तिच्या भारतात परतण्यासाठी विमान तिकिटाचीही व्यवस्था करण्यात आली. अखेर ही महिला मुंबईत दाखल झाली आणि सुखरूप मायदेशी परतली.

या संपूर्ण प्रक्रियेत राहुल तुळपुळे यांच्यासह श्वेता करंदीकर, प्रसाद दातार आणि प्रसाद पाटील यांनीही विशेष प्रयत्न केले.

नोकरीचे आमिष दाखवून महिलांना परदेशात पाठवून त्यांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. परदेशात नोकरीसाठी जाताना एजंटची विश्वासार्हता आणि नोकरीसंबंधी कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. आकर्षक पगाराच्या आमिषाला बळी पडून कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57

तुळशी विवाह कधी? २१ नोव्हेंबर की २० नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Friday, 20 November 2026, 18:31

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी ३१ किमीची जमिनीखालील रस्ता बोगदा प्रणाली; बीकेसी, विमानतळ आणि द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार!

Friday, 20 November 2026, 18:30
Next Post

१४ महिलांसोबत संबंध, लग्नाचं अमिश दाखवून आरोपी परदेशात पसार; पैसे उकळले, अश्लील व्हिडिओची धमकी अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp