Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातल्या ‘त्या’ कॅफेत सुरु होता विचित्र प्रकार! पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर जे दिसलं ते…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 July 2026, 15:44

पुणे: पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका कॅफेमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पुणे वन विभागाने छापा टाकत दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, १५ नखे आणि दोन सुळे जप्त करण्यात आले आहेत.

वन विभागाला कॅफेमध्ये बिबट्याच्या अवयवांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी साध्या वेशात कॅफेमध्ये सापळा रचला. काही वेळातच दोन संशयित तेथे आले आणि अवयवांची देवाणघेवाण सुरू केली. त्याच वेळी वन विभागाच्या पथकाने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आदेश रेवजी पारधी (वय २५) आणि शुभम बाळू पारधी (वय २१) अशी असून, दोघेही जुन्नर तालुक्यातील वरखेडे डिंगोरे येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, बिबट्या हा वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची क्रमांक एकमधील संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे या गुन्ह्यासाठी दोषी ठरल्यास तीन ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

 

या प्रकरणामागे मोठे तस्करीचे जाळे कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने केली.

वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर तस्करी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाइनवर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06
Next Post

बजरंग सोनवणे यांच्या अडचणी वाढल्या? विलास घुले प्रकरणात मुलाचे नाव चर्चेत,अटकेसाठी थेट मोर्चा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp