HSC Result : उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथील इयत्ता बारावीतील शास्त्र, कला, वाणिज्य व किमान कौशल्य या सर्व शाखांचा निकाल ८७.०१ टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली. बारावीला उरुळी कांचन येथील महाविद्यालयात ६१६ विद्यार्थी बसले होते. यातील ५३६ विद्यार्थी हे परीक्षेत पास पास झाले आहेत. (HSC Result)
कला शाखेचा निकाल हा ८०.४५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल हा ८९.३५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल हा ८८. ३८ टक्के लागला आहे. तर किमान कौशल्य या शाखेचा निकाल ९५.१८ टक्के लागला आहे. एकूण ६१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ५३६ विद्यार्थी पास झाले आहेत. (HSC Result)
विद्यालयातील सर्व शाखांमधून प्रथम तीन आलेले विद्यार्थी
विज्ञान शाखेतून प्रणव उमेश डिंबळे ७४.५० टक्के,
वाणिज्य शाखेतून वैष्णवी विजय गव्हाणे ८५ टक्के,
कला शाखेतून आकांक्षा प्रवीण कांबळे ८४.६७ टक्के,
किमान कौशल्य विभागात तुषार बाळू काळे ६७.६७ टक्के
गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
दरम्यान, विद्यालयातील सर्व शाखांमधून प्रथम तीन आलेले विद्यार्थी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.