पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली होती. संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या आरोपीचा शोध १३ पथकांच्या माध्यमांतून घेण्यात येत होता. अखेर या आरोपीला गुणाट या गावातून पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आज (शुक्रवार) दुपारी तीननंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मंगळवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनाकडून स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून १३ ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती. तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोधा घेतला जात होता.
आरोपीने मागील काही दिवसात ज्या ज्या व्यक्तींना फोन केले होते. त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी करण्यात येत होती. त्याच दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणार्या नागरिकाला पुणे पोलिसांकडून एक लाख रूपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावातील आहे. त्या अनुषंगाने आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून दिवसभर आरोपीचा शोध घेतला.
त्या दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यास आला होता. मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायच असल्याच सांगून आरोपी हा नातेवाईकांच्या घरातून निघून गेला.
अखेर आरोपीला अटक..
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांकडून शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. मंगळवारी पहाटे घटना घडल्या नंतर पोलिसांची एकूण १३ पथके आरोपीचा शोध घेत होते. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले.
या शोध मोहिमेत पोलिसांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, अखेर रात्रीच्या सुमारास गुणाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपींला पोलिसांनी अटक केली असून लष्कर पोलिस स्टेशन येत आणण्यात आले आहे.
आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, आज (शुक्रवार) दुपारी तीननंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त (झोन २) स्मार्तना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.”