पुणे : पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. अशी घोषणा रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
पुणे-भुसावळ ही गाडी क्रमांक ११०२५ आणि ११०२६ अर्थात पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस दैनंदिन प्रवास्यांची वाहतूक करते. ही एक्सप्रेस भुसावळसह जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकांवरून कल्याणमार्गे पुणे येथे जाण्यासाठी अतिशय महत्वाची गाडी आहे.
दरम्यान, कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमॉडेलींगच्या काम सुरु झाले असल्याने हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
यामुळे दोन महिन्यांपर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तर, या कालावधीत किमान पनवेलपर्यंत जाणारी तात्पुरती एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात येत आहे.