Pune News : पुणे : जमिनीच्या वादातून सख्ख्या नात्यांमध्ये टोकाचे वाद होवून दुरावा आल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. आता, जमिनीच्या हव्यासापोटी जावयाचेच अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलिसांना याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीमध्ये, सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरा रमेश गेमा राठोड यांच्यासह (Pune News) नातेवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक गेमा राठोड (सर्व रा. शाहूनगर तांडा, पोस्ट बंगाली पिंपळा, गेवराई, बीड) यांनी आडे यांची पत्नी आर्तिका यांच्या नावावर जमीन करून द्यावी यासाठी आडे यांचे अपहरण केल्याचे म्हटले आहे.
जावयाने त्याच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून द्यावी, यासाठी सासऱ्याने नातेवाइकांच्या मदतीने चक्क जावयाचेच अपहरण केले. पुण्यातून जबरदस्तीने जावयाला चारचाकीत बसवत ते थेट बीड येथे घेऊन गेले. एका गोठ्यात नेत, दोरीने त्याचे हात-पाय बांधून ठेवले. (Pune News) याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅट्रीक करणार; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास