Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News :पुण्यातील ‘हे’ १५ रस्ते ठरणार ‘व्हीआयपी; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पुणे महापालिकेचा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 10 September 2023, 12:54

Pune News : पुणे : पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा, जी-२० बैठका, क्रीडा स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या निमित्ताने सातत्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे सुरू असतात. या दौऱ्यांदरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात येते. त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या…’ अशी स्थिती असते. रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करून त्यावर बक्कळ पैसा खर्च करण्यात येतो. या प्रकारमुळे पुणे महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले होते. त्यामुळे पुणे महापालिकेने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका शहरातील १५ प्रमुख रस्त्यांकडे व्हीआयपी रस्ते म्हणून पाहणार आहे. या रस्त्यांची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती आणि सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.

रस्त्यांची होणार नियमित देखभाल-दुरुस्ती

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहरात येणार असल्यास महापालिका पाण्यासारखा पैसा खर्च करून, तात्पुरती डागडुजी करत असल्याची टीका वेळोवेळी होत असते. (Pune News ) मुंबई उच्च न्यायालयाने देखील याच कारणास्तव महापालिकेला फटकारले होते. केवळ दाखविण्यासाठी महापालिका हे काम करत असल्याची टीकाही झाली होती. त्यामुळे आता १५ रस्त्यांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

विमानतळ, रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचा व्हीआयपी रस्त्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यात येणार आहेत. (Pune News ) त्याचबरोबर दुभाजक तयार करून रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रस्त्यालगतच्या भिंतींनाही रंगरंगोटी करण्यात येणार आहे. दुभाजकांनाही पुन्हा रंगरंगोटी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी चौकांची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

 

व्हीआयपी १५ रस्त्यांची निवड ही आदर्शपणे केलेली आहे. हे मुख्य रस्ते असून, शहरातील बहुतांश वाहतूक याच रस्त्यावरून होते. त्यामुळेच त्यांना व्हीआयपी रस्ते म्हटले आहे. (Pune News ) यातील सोलापूर रस्ता आणि नगर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सुशोभीकरणाच्या कामासाठी ४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

पुण्यातील १५ व्हीआयपी रस्ते पुढीलप्रमाणे

– पर्णकुटी चौक ते वाघोली-बकोरी फाटा – नगर रस्ता

– वानवडी चौक ते आकाशवाणी मांजरी चौक – सोलापूर रस्ता

-मगरपट्टा चौक ते खराडी बायपास चौक – मगरपट्टा रस्ता

– पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण, बावधन सर्कल चौकापर्यंत – पाषाण रस्ता

– पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेल चौक – बाणेर रस्ता

– सीओईपी चौक ते पर्णकुटी चौकापर्यंत – संगमवाडी रस्ता

– पुणे विमानतळ ते गुंजन चौकापर्यंत – विमानतळ रस्ता

– खंडोजीबाबा चौक ते वारजे चौकापर्यंत – कर्वे रस्ता

– पौड फाटा ते चांदणी चौक – पौड रस्ता

– स्वारगेट चौक ते गुजरवाडी चौक – सातारा रस्ता

– लक्ष्मीमंदिर चौक ते नांदेड सिटी चौक – सिंहगड रस्ता

– पुष्पमंगल चौक ते अप्पर बस डेपो चौक – बिबवेवाडी रस्ता

– कोरेगाव पार्क पेट्रोल पंप ते ताडीगुत्ता चौक

– सीओईपी चौक ते पुणे विद्यापीठ चौक – गणेशखिंड रस्ता

– स्वारगेट चौक ते सिमला ऑफिस चौक हेरिटेज वॉकसाठी बाजीराव रस्ता व शिवाजी रस्ता

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅट्रीक करणार; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

Pune News : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे तरुणाच्या बेतले जीवावर ; चुकून झाडली गेलेली गोळी घुसली मित्राच्या मानेत, हवेली तालुक्यातील घटना..

Pune News : मुलीच्या नावावर जमीन करण्यासाठी जावयाचे अपहरण ; गोठ्यात बांधून मारहाण, येरवडा परिसरातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Pune News : जमिनीच्या हव्यासापोटी जावयाचे पुण्याहून थेट बीड येथे अपहरण; सासऱ्यासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.