हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक, मानसिक क्षमतेबरोबरच, जिगरही देखील असणे आवश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे साधारण चालताना देखील शरीराची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच यशस्वी होतात असे मत एव्हरेस्टवीर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी लोणी काळभोर येथे व्यक्त केले. (PSI Shivaji Nanavare)
जिल्हा (ग्रामीन) पोलिस दलातील उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी नुकतेच एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले आहे. शिवाजी ननवरे यांच्या कामगीरीबद्दल प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ व “पुणे प्राईम न्यूज” च्या वतीने “पुणे प्राईम न्यूज” च्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना शिवाजी ननवरे यांनी वरील मत व्यक्त केले. (PSI Shivaji Nanavare)
यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व पुणे प्राईम न्यूजचे संपादक जनार्दन दांडगे, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे खजिनदार विजय काळभोर, तालुकाध्यक्ष संदीप बोडके, कार्याध्यक्ष सचिन सुंबे, पत्रकार हनुमंत चिकणे, नाकोडा ज्वेलर्सचे मालक भैरव जैन उपस्थित होते.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा
पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांचे मुळ गाव कोंढेज ( ता. करमाळा, जि. सोलापूर ) हे आहे. त्यांनी दि. १७ मे २०२३ रोजी सकाळी साडे अकरा वाजता जगातील सर्वात उंच ठिकाणी माउंट एवरेस्ट येथे तिरंगी झेंड्या बरोबरच महाराष्ट्र पोलीस, पुणे ग्रामीण पोलीसांचा झेंडा रोऊन पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (PSI Shivaji Nanavare)
शिवाजी ननवरे हे महाराष्ट्र पोलीस दलातील चौथे एव्हरेस्टवीर ठरले आहेत. आयपीएस आधिकारी सुहेल शर्मा पहिले, पोलीस हवालदार रफिक शेख ( छत्रपती संभाजीनगर ) हे दुसरे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव (पुणे शहर) हे तिसरे एव्हरेस्टवीर आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील ते पहिलेच एवरेस्टवीर आहेत.
माऊंट एव्हरेस्ट शिखर हे चढाईस अत्यंत खडतर मानले जाते. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शिवाजी ननवरे यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकविला. शिवाजी ननवरे यांना २०१८ साली पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. २०१९ साली केंद्र सरकारच्या आंतरिक सुरक्षा पदकाने तसेच खडतर सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. (PSI Shivaji Nanavare)
शिवाजी ननवरे यांना द अल्पिनीस्ट ( The Alpinist) चे एव्हरेस्टवीर भगवान चवले व एव्हरेस्टवीर सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आहे. माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. हिमालय पर्वतातील हे शिखर ८८४८.८६ मीटर उंचीचे असून नेपाळ, चीन सीमेवर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा तर तिबेट मध्ये याला चोमोलुंगा नावाने ओळखलं जातं.
दरम्यान, माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी वळती येथील उद्योगपती एल. बी. कुंजीर, थेऊरफाटा येथील श्रीनाथ ग्रामिन बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपशेठ धुमाळ, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी, संदीप चावट, गणेश आबा चौधरी व मनीष शेठ काळभोर यांनी मोठी आर्थिक मदत केल्याचेही शिवाजी ननवरे यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Mount Everest : पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केले माऊंट एवरेस्ट शिखर
Mount Everest : पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केले माऊंट एवरेस्ट शिखर