संदीप टूले
केडगाव( दौंड ) : देलवडी व एकेरीवाडी गावच्या यात्रेत विघातक कृत्य करण्यांची गय केली जाणार नाही कोणी कितीही ताकद लावा कायदा मोडला की आम्ही गुन्हा दाखल करणार म्हणजे करणारच असा सज्जड दम यवत पोल्सी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी दिला आहे.
दौंड तालुक्यातील देलवडी व एकेरीवाडी या गावांची यात्रा सोमवारी (ता. १८) सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांच्या वतीने यात्रा उत्सव नियोजनाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माहिती देताना शेळके बोलत होते. यावेळी दोन्ही गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या सह यात्रा कमिटी पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी देलवडी (ता. दौंड) येथे हजारो भाविक येतात. या वर्षीही दोन्ही गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने धार्मीक व मनोरंजनासाठी सांस्कृतीक (तमाशा) कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, यात्रेमध्ये काही टवाळखोरांकडुन उपद्रव केला जातो. देलवडी व एकेरीवाडी यात्रेत भांडणाचे प्रकार घडले आहेत. या पाश्वभुमीवर यवत पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक यांनी टवाळखोरांच्या विरोधात भुमिका स्पष्ट केली.
यापुढे बोलताना शेळके म्हणाले, यात्रेत मोठया प्रमाणात गर्दी असते. चोरीचे प्रकार घडतात. महीलांनी मौल्यवान दागीन्यांवर लक्ष ठेवावे. लहान मुलांवर लक्ष ठेवा. मंदीरात दर्शनाला जाताना घरी एखादा तरी व्यक्ती थांबा, पाळणे, तमाशा तसेच कुस्त्यांच्या आखाड्या दरम्यान भांडणाचे प्रकार घडणार नाही याची काळजी घ्य़ा. आवश्यक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय साध्या वेशात ही पोलिस फिरणार आहेत तसेच गावातील कॅमेऱ्यावर आमची नजर असणार आहे. या तंबीने टवाळखोरचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अनुचित प्रकार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार
यात्रेत गोंधळ, छेडछाड आदी अनुचित प्रकार करणाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या जाणार आहेत. यात्रेत तुम्ही मजा व उपद्रव करणार आणी पोलिस बघ्याची भुमिका घेणार हे कधीच होणार नाही. कायदा मोडला की सोडणार नाही. कोणी कितीही ताकद लावली किंबहुना कोणी कोणास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तरी कारवाइ करणार म्हणजे करणारच आहे. टवाळखोरांना सळो की पळो करुन सोडणार हे नक्की.
– आकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक, यवत पोलीस ठाणे