Pune Crime : खडकवासला, (पुणे) : आयुर्वेद उपचार केंद्राच्या (Ayurveda treatment center) नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर (prostitution business) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ( social security department of the crime branch) छापा टाकला आहे. यामध्ये आयुर्वेद उपचार केंद्राच्या मालकासह दोघांविरुद्ध (registered against both the owner) गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात (Manikbagh area on Sinhagad road) हि घटना घडली आहे. (Pune Crime).
बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरात एका इमारतीत आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली व छापा टाकला.
दरम्यान, पोलिसांनी सदर ठिकाणावरून दोन महिलांना ताब्यात घेतले. तसेच आयुर्वेद उपचार केंद्राचा मालक आणि व्यवस्थापकास यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी मोबाईल संच तसेच रक्कम असा एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल तेथून जप्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका, वाकडमधील प्रकार