सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
सासवड: सासवड नगर परिषदेनेत स्वच्छ सर्वेक्षण रँकिंग स्पर्धेद्वारे समिती घटित करून विविध आस्थापनाचे परीक्षण दिले होते. त्यामध्ये स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा, स्वच्छ महाविद्यालय, स्वच्छ शासकीय कार्यालय आणि स्वच्छ सोसायटी यांचा समावेश होता. यामध्ये पहिल्या तीन स्वच्छ आस्थापनांना नगरपरिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्वच्छ हॉस्पिटलमध्ये चिंतामणी हॉस्पिटल ने पहिला क्रमांक, मोरया हॉस्पिटल दुसरा क्रमांक व युनिटी हॉस्पिटल ने तिसरा क्रमांक पटकावला.
स्वच्छ सोसायटीमध्ये सहारा सिल्वर सोसायटीने पहिला क्रमांक, एम. बी प्यारोडाइज ने दुसरा क्रमांक, पांडुरंग भवन ने तिसरा क्रमांक पटकावला.
स्वच्छ शाळांमध्ये शिवाजी इंग्लिश मीडियम हायस्कूल पहिला क्रमांक, पुरंदर हायस्कूल दुसरा क्रमांक व म.य.सो वाघिरे हायस्कूल तिसरा क्रमांक पटकावला. स्वच्छ महाविद्यालयामध्ये फार्मसी कॉलेज प्रथम क्रमांक, वाघिरे महाविद्यालय दुसरा क्रमांक पटकावला स्वच्छ शासकीय कार्यालयामध्ये पंचायत समिती पुरंदर प्रथम क्रमांक, उपविभागीय अधिकारी पुरंदर कार्यालय दुसरा क्रमांक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला. स्वच्छ हॉटेलमध्ये ग्रँड मल्हार प्रथम क्रमांक, स्वामी हॉटेल दुसरा क्रमांक व विसावा हॉटेल ने तिसरा क्रमांक पटकावला.
सदर बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी पुरस्कारांचे आभार मानले. कचरा हा घंटागाडी मध्ये टाकावा. हॉस्पिटलमध्ये मेडिकल वेस्ट मटेरियल हे व्यवस्थित रित्या संकलित करून त्रयस्थ संस्थेस देण्यात यावे. इतरत्र टाकू नये, नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवावा,असे आव्हान केले. तसेच नगरपरिषदेच्या वतीने यापुढेही स्वच्छ वॉर्ड रॅंकिंगच्या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे सुद्धा अहवान सासवड नगर परिषदेने मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी सासवड नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, स्वच्छ सर्वेक्षण नोडल अधिकारी पायल पोमण, शहर समन्वयक राम कारंडे तसेच हॉस्पिटल, हॉटेल, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आणि सोसायटीचे अधिकारी ,पदाधिकारी आदी उपस्थित होते.