उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हनुमान तरुण मंडळाची मानाची पहिली दहीहंडी सकल जागृत हिंदू समाज उरळी कांचन पंचक्रोशी या संस्थेतील कन्या प्रांजल कदम हिने फोडली. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील मेन बाजार पेठत मारुती मंदिराजवळ या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोहोत्सव मागील 50 वर्षापासून मंडळाकडून साजरा केला जातो. यावेळी हजारो नागरिकांनी गोपाळ काल्याचा व सोहळ्याचा आनंद लुटला.
यावेळी डीजेच्या लावण्यावर व गाण्यावर गोपालभक्तानी व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी 16 हजार पयांचे रोख रक्कम कदम यांना देण्यात आले. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील तरुणाई सहभागी झाली होती. तसेच हनुमान तरुण मंडळ सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.