Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एमआयटी एडीटी’ची ‘इप्फी’त ‘प्रदक्षिणा’; प्रथमेश महाले ठरला सर्वांत तरुण दिग्दर्शक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 18:03

पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनचा विद्यार्थी प्रथमेश महाले दिग्दर्शित ‘प्रदक्षिणा’ या १४ मिनिटांच्या मराठी लघुपटाची नुकत्याच गोवा येथे झालेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इप्फी) निवड झाली.

‘इफ्फी’साठी जगभरातून अनेक निर्मात्यांनी त्यांच्या लघुपटांची नोंदणी केली होती. मात्र, त्यातील पॅनोरमा विभागात केवळ २२ लुघपट निवडले गेले. या प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवात एमआयटी एडीटीचा झेंडा रोवण्याची संधी प्रथमेशला मिळाली.

प्रथमेश हा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधील फिल्म आणि व्हिडिओ डिझाइन शाखेत शिकत असून, पदवीचे शिक्षण घेत असताना इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात लघुपट सादर करणारा तो कदाचित सर्वांत तरुण दिग्दर्शक आहे. त्याने स्वतःच हा लघुपट लिहून संपादन देखील केले आहे. प्रथमेशसोबत त्याचे आई-वडील आणि फॅकल्टी मेंबर्सही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते.

 

या वेळी प्रथमेशला इफ्फीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथमेशच्या या उपलब्धीबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनीता कराड, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे व कुलसचिव डॉ. महेश चोपडे, इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे संचालक डॉ. नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता डॉ. आनंद बेल्हे यांनी त्याचे कौतुक केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post

अॅनिमल, सॅम बहादूरच्या रेसमध्ये मृणाल ठाकूर आणि नानीचा चित्रपट जिंकतोय प्रेक्षकांची मनं; 'हाय नन्ना' मास्टरपीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.