-बापू मुळीक
सासवड : माहूर (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी पूनम तुषार माहुरकर यांची बिनविरोध निवड झाली. माहूरच्या सरपंच जयश्री भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये पुनम माहुरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली सरतापे व गाव कामगार तलाठी विनोद बोकडे व ग्रामसेवक काशिपंथी सुतार यांनी माहूरकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
पुनम माहुरकर या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुषार माहूरकर यांच्या पत्नी आहेत. तसेच पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत नेते सुरेशशेठ माहुरकर यांच्या त्या सून आहेत. आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माहूर गावच्या सर्वांगीण विकासाला गती देणार असून, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माहुरकर यांनी सांगितले. यावेळी नीरा बाजार समितीचे सभापती शरदराव जगताप यांनी सत्कार करताना म्हणाले, माहूरकर घराण्याचा प्रथमच सरपंच पदाचा मान यांना मिळाला आहे. आम्ही गावच्या विकासासाठी सर्व एकत्रितपणे काम करू.
यावेळी रवींद्र जगताप, तुकाराम जगताप, सुशील चव्हाण, राम जगताप, रमेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य रामदास जगताप, राजेंद्र जगताप, जयश्री भोसले, मेघा जगताप, उज्वला जगताप, महादेव जगताप, पद्माकर जगताप, प्रभाकर माहूरकर, राजेंद्र माहुरकर, किशोर जगताप, संजय जगताप, दादासो जगताप, तुकाराम चव्हाण, बाबुराव चव्हाण, समीर माहूरकर, भाऊ माहुरकर, शंभू गाडगे आदी उपस्थित होते