Politics | पुणे : कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीत सभा घेतली. या सभेदरम्यान त्यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. या दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांची मिमिक्री केली. त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता, त्यांनी राज ठाकरे यांना प्रत्यत्तर दिले.
अजित पवार म्हणाले की, ”मिमीक्रीशिवाय राज ठाकरे यांनी काय जमते. मिमिक्रीकरणे त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे. त्यांचा तो छंद आहे. त्यांच्याकडे आता दुसरे काही काम नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे. एकदा 14 आमदार निवडुन आले. नंतर एकच आमदार निवडुन आला. त्यांना सगळे लोक सोडून गेले आहेत. पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारांचे व्यंग चित्र काढणे, त्यातून बरे वाटत असेल. तर त्यांना शुभेच्छा आहेत.”पुण्यात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
संभ्रामाचे वातावरण का केले जाते असे विचारले असता, माझे काम ज्यांना बघवत नाही, असे लोक संभ्रमाचे वातावरण तयार करतात. माझ्यावर अतिप्रेम करणारे लोक असे करतात. असेही त्यांनी रित्या सांगितले.शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला का हजर नव्हते, असे विचारले असता, पवार साहेबांनी आदेश दिला. त्याचे पालन केले असे उत्तर दिले. तसेच मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित रित्या आणावे. त्यासाठी राज्यसरकारला पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील.
मुख्यमंत्री कुठे गेले आहेत, असा प्रश्न विचारला असता, ”ते कुठे जातात याला मला काय करायचे आहे, ते कुठे हे माहिती नाही. मी कोणाच्या वाॅचवर नाही. मला माझे काम करु द्या.” असेही त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics : अखेर ठरले ! राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष ;या दिवशी घोषित केला जाणार