Politics News – पुणे : बालभारती-पौडफाटा रस्ता, नदीकाठसुधार प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याचा आक्षेप घेऊन पुण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या प्रकल्पांना विरोध केला आहे. या प्रकल्पांविरोधात नागरिकांनी एकत्र येऊन रॅलीही काढली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडीवर जाऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच नागरिकांना नको असलेला विकास कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत प्रकल्प रद्द करण्याची भूमिका मांडली. यावरून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आदित्य ठाकरे यांनी चांगलेच ठणकावले आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले,
पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही असे मोहोळ यांनी ठणकावले असून कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका.
मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची अधिक जाण आणि तळमळ आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडला होता. स्वतःच्या ‘इगो’पायी मुंबईकरांच्या डोक्यावर १० हजार कोटींचा बोजा आला. पर्यावरणाचे रक्षण आणि ज्वलंत नागरी प्रश्नांची सोडवणूक यांचा समतोल न राखता येणाऱ्यांनी पुण्यात येऊन अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही बोलावे, हा मोठा विनोद आहे. असेह ते म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Politics News: पुण्यात भाजपचा शिवसेनेला धक्का : निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा भाजपात प्रवेश