गणेश सुळ
Daund News केडगाव : महाराष्ट्रात घडलेल्या राजकारणातून एकच गोष्ट साध्य होते की, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा मित्र ही नसतो.(Daund News) त्यामुळे कोण, कधी कसा एखाद्याचा राजकीय गेम करेल याची शाश्वती कुणालाच नाही. (Daund News) मात्र, ही वस्तुस्थिती 2009 सालीच दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ओळखली होती आणि त्यातच त्यांना राजकीय पक्षांच्या बेभरवशाचा अनुभव आल्याने त्यांनी आपल्या तालुक्याचा विकास करणाऱ्या आणि आपल्याला कायम साथ देणाऱ्या पक्षाचा शोध सुरू केला होता. ज्यात ते नंतर अनेकांपेक्षा उजवे ठरले आहेत. (Daund News)
कुल यांनी पक्षीय धोरणांचा आणि त्यात होणाऱ्या घुसमटीचा अनुभव घेऊन 2014 ची निवडणूक स्वबळावर रासप पक्षाकडून लढवत बाजी मारली. मात्र, त्यावेळीही त्यांना काही वेगळे अनुभव आले. ज्यावरून त्यांची राजकीय परिपक्वता वाढत गेली. यावेळी त्यांना भाजप हा साथ देणारा, कार्यकर्ते, नेत्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभा राहणारा, सक्षम पक्ष असल्याचे त्यांना जाणवले. भाजपमध्ये जाऊ नये, नुकसान होईल असे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनीही कुल यांच्या कानावर ही बाब घातली होती. मात्र, हा राज्यात असा पक्ष राहील, ज्याच्या सरकारमध्ये मित्रच काय पण विरोधी पक्षही सामील होण्यास उत्सुक असतील, असे मत त्यावेळी आमदार कुल यांनी वर्तवले होते.
कुल यांनी 2019 ला ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्यांनी विजयही मिळवला. त्यांना हा विजय मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी जिल्ह्यात भाजपची परिस्थिती बिकट असतानाही कुल यांचा मात्र दौंडमध्ये विजय झाला. पुणे जिल्ह्यात राहुल कुल हे भाजपकडून निवडून आल्याचे एकमेव उदाहरण असेल. या विजयानंतर मात्र राहुल कुल यांनी आघाडीचे सरकार असतानाही विकास कामे आणि कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांची कामे होऊ लागली आणि जो डाग भाजपवर लागला होता तो या तालुक्यात मात्र पुसला जाऊ लागला.
भाजप-युतीचे सरकार पुन्हा आले अन्…
महाविकास आघाडी सरकारनंतर राजकीय उलथापालथ होऊन भाजप-युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आणि कुल यांच्या व्हिजनवर यावेळी भाजपने त्यांना मोठी साथ देण्यास सुरुवात केली ती आजपर्यंत सुरू आहे. त्यामुळे जी सर्व समावेशक विकासकामे झाली, कारखाना सुरू झाला, रस्ते झाले ते पाहता आमदार राहुल कुल यांनी त्यावेळी भाजपमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला होता तो एकदम बरोबर होता. हे आता त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व धर्मातील लोकांनाही कळाले आहे. सध्या भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी नेते आणि पक्षांमध्ये लागलेली चढाओढ पाहता कुल यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा योग्य होता आणि या निर्णयामुळे ते त्यांच्यापेक्षा जेष्ठ असणाऱ्या नेत्यांनाही उजवे ठरले आहेत, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.