Political News : हडपसर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट ) हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी प्रवीण तुपे यांची तर महिला अध्यक्षपदी वंदना मोडक यांची निवड करण्यात आली.
हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष म्हणून हेमंत बधे यांची तर महिला कार्याध्यक्षपदी सविता अनिल मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
महिला कार्याध्यक्षपदी सविता अनिल मोरे
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हडपसर विधानसभा मतदारसंघातील नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष मृणाल वाणी आदिसह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्षा प्रशांत जगताप यांच्या पुढाकारातून कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या विचारांचा आहे, पदाधिकारी सोडून दुसऱ्या गटात गेले चांगल्या सक्षम कार्यकर्त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघात नेमणूक केली असून आगामी काळात चांगल्या पद्धतीने बांधणी करून निवडणुकामध्ये यश संपादन केले जाईल.
हडपसर विधानसभा मतदारसंघात अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आहे, शरद पवार व प्रशांत जगताप यांनी संधी दिली आहे मतदारसंघात सर्व जातीधर्मांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कात्रज पासून मांजरी पर्यंत सर्वसमावेशक कार्यकारिणी करणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी सांगितले.
जास्तीत जास्त महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या विचारांशी जोडणार आणि हडपसर मध्ये बांधणी करणार असल्याचे नवनिर्वाचित महिला अध्यक्षा वंदना मोडक, कार्याध्यक्ष सविता मोरे यांनी सांगितले.