Political News | पुणे : विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची एकत्रित एन्ट्री झाल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे चांगलेचे चर्चांना उधाण आले होते. ते दोघे आता एकत्र येणार का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे. अशातच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उध्दव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी आणि फडणवीस यांच्या दोस्ती मध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे सरकार गमावल्यानंतर स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत आहेत.
शिवसेना फोडण्यामागे भाजपचा मोठा हात असल्याची चर्चा…
शिवसेना फोडण्यामागे भाजपचा मोठा हात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध कटू आहेत. मात्र त्या दोघेही हसत आणि बराच वेळ गप्पा मारत विधानभवनात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्य होत्या.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा बदल होणार का? अशी चर्चा राजकीय वर्चतुळात रंगली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याच्या कुठेही चर्चा नाहीत. बंद खोलीत पण चर्चा नाही आणि ओपन गार्डनमध्ये पण नाही, सुतावरून काही परीक्षण केलं जातंय, असा काही चान्स नाहीत, पण राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकत. असे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता राजकारणात पुन्हा काय मोठ्या घडू शकतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
News Delhi | केंद्र सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल विरोधी पक्षांचे नेते आले एकत्र
विचार तुमचे लिखाण आमचे;जागतीक महिला दिन : महिला मार्गदर्शन केंद्र उभारणी गरजेचे