Nagar Crime नगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात मद्यपान करून वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यासोबतच मुख्य चौकांमध्ये कोतवाली पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून, वाहनधारकांची चौकशी केली जात आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ६ आणि ४ टवाळखोरांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन राजेंद्र नायक (वय 22 वर्ष, रा. नेहरूनगर भिंगार,अहमदनगर), दर्शन किरण शहाणे (वय 21 वर्ष, रा. भिंगार ब्राह्मण गल्ली, अहनदनगर), महादेव म्हातारदेव गोल्हार (वय 35 रा. करोडी, ता.पाथर्डी, जिल्हा अहमदनगर), संतोष लिंबाजी आभाळे (वय ४१ रा.आभाळवाडी, ता. संगमनेर , जि. अहमदनगर), रामेश्वर भरत गणेशकर (वय 23 वर्ष, रा.दरेवाडी अहमदनगर), लक्ष्मण पांडुरंग मोटे (वय 38 वर्ष, रा. नेप्ती बायपास रोड, अहमदनगर) या सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळामध्ये गर्दीच्या ठिकाणी मद्यपान करून सर्व सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. चारचाकी, दुचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस जवान शरद वाघ, सागर पालवे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सतीश भांड, सोमनाथ मुरकुटे, श्रीकांत खताडे यांनी केली.