लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे यांची नियुक्ती करण्यात आली. हे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता.१३) जारी केले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांची फेब्रुवारी महिन्यात बदली झाल्याने सदर पद रिक्त झाले होते. आता त्यांच्या जागेवर विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, दत्ताराम बागवे यांची प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे.
कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख
दत्ताराम बागवे यांनी वारजे माळवाडी, उत्तम नगर व विशेष शाखेत कार्यरत असताना, आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. दत्ताराम बागवे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. आपल्या ‘सिंघम’ स्टाईल कामांमुळे ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीलाही आता चाफ बसणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.