पुणे : अंतर्गत राजकारणामुळे पुणे महापालिकेत बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सहायक क्रीडा अधिकारीपदी पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली. सेवाज्येष्ठतेनुसार सोनाली कदम यांना या पदावर पदोन्नती दिली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

क्रीडा सेवा श्रेणी-३ या संवर्गातील सहायक क्रीडा अधिकारी हे पद पुणे महापालिकेत दोन माध्यमातून भरण्यात येते. गेल्या बऱ्याच वर्षांपासून पदोन्नतीने पद भरण्यासाठी मंजुरी मिळत नव्हती. सप्टेंबर २०२३ ला तत्कालीन आयुक्तांनी पदोन्नतीने पद भरण्यासाठी मान्यता दिली होती. तरीही ही प्रक्रिया पुढे सरकत नव्हती. आता पदोन्नतीने पद भरण्यासाठी मान्यता दिली.







