Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMC Election: पुणे मनपा निवडणुकीत ‘सेना विरुद्ध सेना’ थेट लढत! शिंदे गट ठाकरेंच्या नेत्याच्या ‘होमग्राऊंड’मधून प्रचाराचा नारळ फोडणार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 22:36
PMC Election: 'Sena vs. Sena' direct fight in Pune Municipal Corporation elections! Shinde group will launch campaign from Thackeray's leader's 'home ground'...

पुणे: पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक (PMC Election) ही शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी (Pune News) प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच महापालिका निवडणुका होत असल्याने पक्षाची ताकद, संघटना आणि जनाधार यांची खरी परीक्षा या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटांकडून स्वबळ सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. (Breaking News)

भाजपने युतीचा पर्याय जवळजवळ दुर्लक्षित केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढवावी लागू शकते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट मनसे किंवा महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांसोबत आघाडी करून मैदानात उतरणार असल्याचे संकेत आहेत.

शिंदे गटात पुणे महापालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर ठाकरे गटाची बाजू मजबूत करण्याची जबाबदारी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या वसंत मोरे यांच्यावर असणार आहे.

यंदा वसंत मोरे स्वतःसोबत आपल्या मुलालाही निवडणूक रिंगणात उतरवत आहेत. त्यामुळे वैयक्तिक आणि संघटनात्मक अशा दोन आघाड्यांवर त्यांना कसरत करावी लागणार आहे. एका बाजूला स्वतःची निवडणूक, दुसरीकडे मुलाची उमेदवारी आणि त्यासोबत संपूर्ण पुणे शहरातील शिवसेनेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

 

दरम्यान, शिंदे गटाकडून पुण्यातील प्रचाराची सुरुवात कात्रज परिसरातून होणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. “कात्रजमध्ये 35 कोटी रुपयांच्या निधीचा जीआर देण्यासाठी मी आलो आहे. काही दिवसांत एकनाथ शिंदे स्वतः नवले ब्रिज परिसराची पाहणी करणार आहेत. तसेच कात्रजमध्ये 35 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार असून याचद्वारे आमच्या प्रचाराला सुरुवात होईल,” असं सामंत म्हणाले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Sunday, 30 August 2026, 18:17

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 30 August 2026, 18:00

अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यातील राजकीय-सामाजिक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती..

Sunday, 30 August 2026, 17:33

अन् त्यानं गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या डांबर गोळ्या! दुसऱ्यासोबत प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाचं भयानक कृत्य

Sunday, 30 August 2026, 17:27

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

Sunday, 30 August 2026, 17:06

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Sunday, 30 August 2026, 16:45
Next Post
Supreme Court: Supreme Court's 'historic' verdict on Governor-Government conflict! "There is no 'unlimited' power to stop a bill"; Answer given to 14 questions of the President..

Supreme Court: राज्यपाल-सरकार संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा 'ऐतिहासिक' निकाल! "विधेयक थांबवण्याची 'अमर्याद' ताकद नाही"; राष्ट्रपतींच्या १४ प्रश्नांचं दिलं उत्तर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp