Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Supreme Court: राज्यपाल-सरकार संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा ‘ऐतिहासिक’ निकाल! “विधेयक थांबवण्याची ‘अमर्याद’ ताकद नाही”; राष्ट्रपतींच्या १४ प्रश्नांचं दिलं उत्तर..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 22:59
Supreme Court: Supreme Court's 'historic' verdict on Governor-Government conflict! "There is no 'unlimited' power to stop a bill"; Answer given to 14 questions of the President..

Supreme Court: सुप्रीम कोर्टानं विधानसभेत बहुमतानं मंजूर झालेल्या विधेयकांवर (Draupadi Murmu) राज्यपाल सही न करता ते दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्याच्या अधिकाराबाबत आज (२० नोव्हेंबर २०२५) महत्त्वाचा निकाल दिला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं दिलेल्या निर्णयानुसार, राज्यपालांना कोणतंही विधेयक अमर्याद काळ ‘होळीत’ ठेवण्याचा अधिकार नाही. असा विलंब संघराज्य व्यवस्थेला धोकादायक ठरू शकतो, असं खंडपीठानं स्पष्ट केलं.

घटनापीठात न्या. सूर्यकांत, न्या. विक्रम नाथ, न्या. पी. ए. नरसिम्हा आणि न्या. ए. एस. चंदुरकर यांचा समावेश होता. या खंडपीठानं राज्यपालांच्या अधिकारांची नेमकी मर्यादा स्पष्ट केली. कलम २०० नुसार, कोणत्याही विधेयकासंदर्भात राज्यपालांकडे केवळ तीनच पर्याय उपलब्ध असतात. पहिला म्हणजे विधेयकावर सही करून त्याला मंजुरी देणे; दुसरा, त्यात काही त्रुटी जाणवल्यास ते पुनर्विचारासाठी विधानसभेकडे परत पाठवणे; आणि तिसरा, आवश्यक वाटल्यास ते विधेयक थेट राष्ट्रपतींकडे पाठवणे. या मर्यादेबाहेर राज्यपालांकडे इतर कोणताही अतिरिक्त अधिकार नसल्याचं न्यायालयानं ठामपणे सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम १४३(१) अंतर्गत राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत सुप्रीम कोर्टाकडे १४ प्रश्न पाठवले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरंही न्यायालयानं या निकालात दिली. न्यायालयानं स्पष्ट केलं की, राज्यपालांसाठी कोणताही ‘नक्की कालावधी’ संविधानात ठरवलेला नाही आणि तो न्यायालय ठरवूही शकत नाही. लोकतंत्रातील लवचिकतेला धोका होईल, असा न्यायालयाचा युक्तिवाद होता.

तामिळनाडू प्रकरणात ८ एप्रिल रोजी दिलेल्या ‘मान्य स्वीकृती’विषयक निरीक्षणाला कोर्टानं या वेळी चुकीचं ठरवलं. कोणत्याही परिस्थितीत कोर्ट एखाद्या विधेयकाला ‘डिफॉल्टनं मंजूर’ मानू शकत नाही, कारण ते न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. शेवटी कोर्टानं सांगितलं की, राज्यपालांचे अधिकार कलम २०० अंतर्गत येतात आणि ते न्यायिक समीक्षेच्या कक्षेत येत नाहीत.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दारूच्या पैशांसाठी जन्मदात्रीच ठरली बळी; मुलाने गळ्यावर वार करून आईला संपवलं,पुण्यात थरार!

Sunday, 30 August 2026, 18:46

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

Sunday, 30 August 2026, 18:29

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Sunday, 30 August 2026, 18:17

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 30 August 2026, 18:00

अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यातील राजकीय-सामाजिक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती..

Sunday, 30 August 2026, 17:33

अन् त्यानं गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या डांबर गोळ्या! दुसऱ्यासोबत प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाचं भयानक कृत्य

Sunday, 30 August 2026, 17:27
Next Post
Todays Horoscope

Todays Horoscope : मीन, मकर, तूळ या राशींचे नशीब चमकणार; तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp