Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“उपचारांऐवजी लूट..”; पैशासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ, शिरूरमधील मोठ्या हॉस्पिटलवर गंभीर आरोप

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 10 September 2025, 13:41

शिरूर : न्हावरे (ता.शिरूर) येथील एका रुग्णाला उपचारासाठी शिरूर शहरातील बड्या नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर, त्या हॉस्पिटलमध्ये संबंधित रुग्णावर चुकीचे उपचार करण्यात आले तसेच हॉस्पिटल प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची लूट झाल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

रुग्ण उपचार घेत असतानाच, “जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी तुमचा रुग्ण वाचणार नाही” असे सांगत नातेवाईकांवर दबाव टाकून रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्यास भाग पाडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून संबंधित रुग्णाला नातेवाईकांनी पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे सुमारे बारा दिवसांच्या उपचारानंतर संबंधित रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला.

या प्रकारामुळे शिरूरमधील संबंधित हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या हॉस्पिटल बाबत वेगवेगळ्या तक्रारी केल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, शिरूर शहरातील त्या बड्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांकडे सर्वप्रथम इन्शुरन्स पॉलिसीची चौकशी केली जाते. त्यानंतर इन्शुरन्स कंपन्यांनी नेमलेल्या ‘टीपीए’शी संगनमताने हॉस्पिटल प्रशासनाकडून क्लेम फुगवून इन्शुरन्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर इन्शुरन्स क्लेमची रक्कम वसूल केली जाते. असा गंभीर आरोप काही रुग्ण व नातेवाईकांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे काही केसेसमध्ये इन्शुरन्स क्लेमचे सर्व पैसे काढून घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याने मोठ्या इन्शुरन्स क्लेमचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

इन्शुरन्स कंपन्या व रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासन आणि टीपीए यांच्या व्यवहारांबाबत शासन स्तरावरून सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. परंतू, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी व काही राजकीय व्यक्तींशी असलेल्या संबंधांमुळे अशा हॉस्पिटलवर कारवाईला विलंब होत असल्याचे स्थानिक नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

“माझे वडील शिरूरमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना, चुकीचे उपचार करण्यात आले. त्यामुळे उपचाराच्या नावाखाली पैशाची लूट करून,माझ्या वडिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित डॉक्टर व हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी.”

– बापू कोकडे(पीडित रुग्णाचा मुलगा)

“संबंधित प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सकांनी गांभीर्याने चौकशी करून दोषींवर फौजदारीसह कारवाई करण्यात यावी.”

-निलेश वाळूंज(सामाजिक कार्यकर्ता)

“संबंधित घटनेत रुग्णाच्या उपचाराबाबत गंभीर प्रकार घडला असल्यास,रुग्णाच्या नातेवाईकांनी रीतसर तक्रार केल्यास,त्यावर समिती नेमून चौकशी करण्यात येईल.”

-नागनाथ यमपल्ले(जिल्हा शल्यचिकित्सक,औंध-पुणे)

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25
Next Post

नायगाव -पेठ येथे रेल्वेसमोर उडी घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp