Pimpri News : पिंपरी : लग्न झालेल्या एकाने मनोरुग्ण तरुणीशी जवळीकता करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथून उघड झाला आहे. विषेश म्हणजे हे कृत्य करण्यासाठी त्याच्या पत्नीने सुद्धा मदत केली आहे. दरम्यान याबाबत तरुणीच्या भावाने जाब विचारला असता भाऊ-वडील यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी, पुणे, येलवाडी या परिसरात घडला. (Shocking! Rape of a mentally ill girl)
आरोपी अटकेत; पत्नीवरही गुन्हा दाखल
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. (Pimpri News)n माणिक नानाबाऊ होरे (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या पत्नीविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून तसेच ती मनोरुग्ण असल्याचे माहिती असून देखील आरोपी माणिक याने तिच्या जबरदस्तीने बलात्कार केला. (Pimpri News) तक्रारदारयांच्या पतीने याबाबत आरोपीला फोन करून जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करत त्यांचा मुलगा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या सगळ्यामध्ये आरोपीच्या पत्नीने तिला साथ दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी चिंचवड हादरलं ! भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या