Pimpri News : पिंपरी : पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील गहुंजे गावाच्या हद्दीत झालेल्या सुरज काळभोर खून झाल्याची माहिती समोर आली होती. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून बाहेर येत नाही तोवरच या खूनचे गुढ समोर आले आहे. सुरज काळभोर याचा खून हल्लेखोरांनी केला नसून त्याच्या पत्नीनेच त्याचा गळा चिरून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. (Shocking information of Suraj Kalbhor murder case in Gahunje; The wife committed the murder by slitting her throat)
पत्नीनेच त्याचा खून झाल्याचा बनाव रचल्याचं देखील पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी पत्नीची उलट तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून केला खून
अंकिता सुरज काळभोर असे पतीचा खून करणार्या पत्नीचे नाव आहे. तिनेच पती सुरज काळभोरचा खून केल्याचे पोलिसांच्या उलट तपासणीत सत्य समोर आले आहे. (Pimpri News )सुरज हा अंकिताचा शारिरीक व मानसिक छळ करत होता. वेळावेळी होणार्या शारिरीक व मानसिक छळाला अंकिता वैतागली होती. त्या रागातून तिने पतीचा काटा काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुरज काळभोरने अंकिताचा छळ केला. वैतागलेल्या अंकितानं सुरजचा संपविण्याचा कट रचला. (Pimpri News ) तिनं पतीला माहेरी म्हणजे गहुंजेला घेऊन जाण्याचे ठरविले. आकुर्डी येथील घरातून सुरज आणि अंकिता निघाले. त्यांनी प्रथम प्रति शिर्डीत साई बाबाचं दर्शन घेतलं. गहुंजे येथील घरी जाण्यापुर्वीच ते आधी शेतात गेले. तिथं गेल्यावर अंकितानं लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला.
पती सुरज बेसावध असल्याचं तिनं पाहिलं अन् सोबत आणलेला चाकू तिनं बाहेर काढला. काही क्षणातच तिनं सुरजचा गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिलं. (Pimpri News ) शेतात असलेला टिकाव अन् दगड तिनं सुरजच्या डोक्यात घातला. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या सुरजचा मृत्यू झाला. दरम्यान, अंकितानं पती सुरजचा हल्लेखोरांनी खून केल्याचा बनाव केला होता.
पोलिसांच्या तपासाणीमध्ये गुढ बाहेर आलं आणि अंकिताने सुरजचा खून केल्याचे स्पष्ट झाले.