Pimpri News : पिंपरी : गुणवत्तापूर्ण सेवा आणि विशेष कामगिरीसाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील सर्व सुरक्षा दलातील अधिकारी आणि जवानांसाठी विविध पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती पोलीस पदकासाठी चौबे यांची निवड करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील संरक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर केली जातात. (Pimpri News) त्यासाठी निवड प्रक्रिया वर्षभर सुरू असते. ही पदके गुणवत्तापूर्ण सेवा आणि विशेष कामगिरीसाठी दिली जातात.
राज्यातील तिघांचा समावेश
यंदा केंद्रीय राखीव पोलीस दलातील एकाला शौर्यसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. देशातील २२९ जणांना शौर्यसाठी पोलीस पदक देण्यात आले, (Pimpri News) त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे. तर ६४२ जणांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे.
देशभरातील ८२ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Pimpri News) अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा यामध्ये समावेश आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : कस्टम विभागाने कुरिअर पकडल्याचे सांगत महिलेला ३६ लाखांना गंडा; एकाला अटक
Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये ५१ जणांना डेंग्यूची लागण; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली!