Pimpri News : पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करत, सत्तेत सामील झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले. या वेळी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे भव्य-दिव्य स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी तब्बल साडेपाचशे किलो वजनाच्या पुष्पहाराने रावेत मुकाई चौकात अजित पवार यांचे भव्य स्वागत केले.
अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
अजित पवार यांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करण्यात आली. याशिवाय सोलापूरवरून भला मोठा साडेपाचशे किलोचा पुष्पहार मागविण्यात आला होता. (Pimpri News) हा पुष्पहाराने अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. आज दिवसभर अजित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
अजित पवारांना मानणारा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वर्ग आहे. अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबादेखील आहे. पिंपरी- चिंचवड शहर म्हणजे अजित पवार, असे समीकरण गेल्या काही वर्षांपूर्वी होते. या मतदारसंघाला अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये येथे भाजपने चांगलाच जम बसवला आहे. (Pimpri News) पिंपरी-चिंचवड महापालिकाही भाजपकडेच आहे. आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने स्थानिक पातळीवर देखील राजकीय समीकरणे बदलत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक देखील तोंडावर आहे. असे असताना आता शहरात अजित पवार काय राजकीय भूमिका गेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता सत्तांतरानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा सभेत अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक करताना दिसतात. सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवार पिंपरीतच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी बोलताना ते भाजपवर सडकून टीका करायचे. (Pimpri News) त्यांच्या धोरणांना विरोध करायचे. भष्ट्राचार, गुन्हेगारी आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारा आणि त्यावर तोडगा काढा, असं त्यांचं मत होतं. मात्र सत्तेत सामील झाल्यापासून ते थेट मोदींच्य़ा कामाचं कौतुक करताना दिसत आहेत. शिवाय विकासासाठी एकत्र आल्याचं ते आवर्जून बोलताना दिसतात. त्यामुळे महापालिकेत आल्यावर ते नेमकं काय बोलतील आणि त्यांनी नेमकी भूमिका काय असेल?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल ६० किलो अफू जप्त