Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar News : शरद पवार म्हणतात, अजित पवार आमचेच नेते… राष्ट्रवादीत फूट पडलेलीच नाही!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 August 2023, 11:49

 Sharad Pawar News : बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच अजित पवार यांच्याबाबत एक विधान केले होते. अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असे विधान केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अजित पवार हे आमचेच नेते असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेलीच नसल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. राजकीय धुरीणांनाही बुचकळ्यात पाडेल असे विधान शरद पवार यांनी केल्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?

बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते. अजित पवार आमचे नेते आहेत, या सुप्रिया सुळे यांच्या विधानावर मत विचारले असता, शरद पवार म्हणाले की, अजितदादा आमचे नेते आहेत, यात वादच नाही. देश पातळीवर पक्षातील एक वर्ग वेगळा झाला, तर फूट पडली असे म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. ( Sharad Pawar News) कोणी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीत देशात मोदीच येणार असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, या सर्व्हेचा बेस मला माहीत नाही. कोणत्या लोकांना विचारलं? किती जणांना विचारलं, हे देखील माहीत नाही. माझ्या माहितीनुसार, महाविकास आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळणार आहेत.

शरद पवार यांचा आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात दौरा आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे सकाळी पवारांची जाहीर सभा होणार आहे. ( Sharad Pawar News) तर संध्याकाळी कोल्हापूरच्या दसरा चौकात सभा होणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sharad Pawar News : मोठी बातमी! राष्ट्रवादीत पुन्हा धक्कातंत्र ; अजितदादा गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीला!

Sharad Pawar News : पुन्हा सर्व नव्याने उभे करू… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रीया! म्हणाले, जनता हा खेळ…

Sharad Pawar News : अजित पवारांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद मिळणार का? शरद पवारांची भूमिका स्पष्ट!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16
Next Post

Pimpri News : पिंपरी चिंचवडमधील कुंडमळा येथे फिरायला गेलेले ४ तरुण बुडाले, दोघांचा मृत्यू, दोघे बचावले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp