Pimpri News : पिंपरी : उपमुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर अजित पवार हे आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तब्बल साडेपाचशे किलो वजनाच्या पुष्पहाराने रावेत मुकाई चौकात अजित पवार यांचे भव्य स्वागत केले. सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते महापालिका अधिकाऱ्यांसोबत शहरातील विकासकामांचा आढावा घेत आहेत. मात्र, या बैठकीत एक वेगळेच चित्र दिसले. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे यांनी प्रशासनासोबत आयेजित केलेल्या बैठकीला अनुपस्थिती दर्शविल्याचे दिसून आले.
राजकीय वर्तुळात चर्चा
अजित पवार यांना मानणारा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वर्ग आहे. अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबादेखील आहे. या मतदारसंघाला अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. (Pimpri News) मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये येथे भाजपने चांगलाच जम बसवला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकाही भाजपकडेच आहे. आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने स्थानिक पातळीवर देखील राजकीय समीकरणे बदलत आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पवार यांनी शहरात लक्ष घातले होते. त्यांच्या सांगण्यानुसार प्रशासन निर्णय घेत होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांनी पुन्हा शहराकडे पाठ फिरवली होती. (Pimpri News) आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. यामुळे या बैठकांकडे सर्वांचेच लक्ष आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार शहरात आले की शिवसेना, भाजपावर सडकून टीका करत होते. आता पवार शिवसेना-भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे हे उपस्थित राहतील, अशी शक्यता होती. (Pimpri News) पण, त्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
दरम्यान, अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, सर्व माजी नगरसेवक उपस्थित आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : अबब! साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने पिंपरीत अजित पवार यांचे भव्य स्वागत…
Pimpri News : अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल ६० किलो अफू जप्त