हनुमंत चिकणे
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. 23)सायंकाळी सहाच्या सुमारास पाण्याच्या टाकीत पडून एका २० महिन्याच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. हर्ष सागर जगताप हे त्या मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असुन, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गलथान कारभारामुळे सात तासाहुनही अधिक काळ हर्ष जगताप याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Postmortem)होऊ न शकल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. (Mismanagement of Uruli Kanchan Primary Health Centre; The autopsy of the child’s body was stopped for seven hours!)
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात एका इमारतीचे काम सुरु आहे. त्या सदनिकेला पाणी मारण्यासाठी सदर ठिकाणी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीत बुडून हर्ष जगताप याचा मृत्यू झाला. सदर घटनेची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी व हर्षच्या नातेवाईकांनी हर्षला उरुळी कांचन येथील प्राथमिक रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी दोघापैकी एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने, हर्षचा मृतदेह तीन तासाहून अधिक काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून होता. (Uruli Kanchan News) ही बाब सुनिल जगताप यांना समजताच, त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही जगताप यांचा मोबाईल फोन घेतला नाही.
जिल्हाधिका-यांच्या हस्तक्षेपानंतर शवविच्छेदन
दरम्यान हर्ष जगताप याच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी प्रिंट व डिजीटल मीडीया पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष व पत्रकार सुनिल जगताप यांनी संपर्क साधल्यानंतर, पुण्यातील ससून या शासकीय रुग्णालयात सात तासानंतर शवविच्छेदन (Postmortem)होऊ शकले. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मनमानी स्वभावाला कंटाळलेल्या, जगताप यांनी थेट पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला. व हर्षचे शवविच्छेदन करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. (Uruli Kanchan News) यावर डॉ. देशमुख यांनी जिल्हापरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मात्र विविध अधिकारी धावून आले.
रात्री बारानंतर ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान शवविच्छेदना (Postmortem)अभावी हर्ष जगताप या बाळाच्या मृतदेहाची हेळसांड होण्यास, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी कारणीभुत असल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे व प्रिंट व डिजीटल मीडीया पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष व पत्रकार सुनिल जगताप यांनी केला आहे.
उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडुन झालेला गलथान कारभार व वरील दोन्ही वैधकिय अधिकाऱ्यांच्या एकुणच कामकाजाबाबत वरीष्ठ पातळीरुन सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची पुढील तीन ते चार दिवसात भेट घेणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी जाहीर केले आहे.
याबाबत बोलतांना पत्रकार सुनिल जगताप म्हणाले,लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीमधील नागरींच्या सोईसाठी दोन वर्षापुर्वी पुणे जिल्हा नियोजन मंडळ तत्कालिन सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांच्या शिफारशीतून उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात शवविच्छेदन गृह उभारण्यात आले होते. (Uruli Kanchan News) आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही, केवळ उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरीकांना शवविच्छेदनासाठी पुण्यात जावेच लागत आहे. दोन्ही अधिकारी एकमेकांच्या सहकाऱ्याने होईल अशा पध्दतीने गैरहजर राहुन उरुळी कांचनच्या जनतेला वेठीस धरत आहेत. ही बाब अतीशय चुकीची आहे. हर्ष जगताप याचा मृतदेह तीन तासाहूनही अधिक काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पडुन असतानांही, वरील दोन्ही वैद्यकीय अधिकारी कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीत ही बाब अतीशय चुकीची आहे. या प्रकरणाची वरीष्ठ पातळीवर चौकशी होण्याची गरज आहे.
हर्ष जगताप हेळसांड प्रकरणात, तालुका आरोग्य अधिकाऱ्यासह दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत- जनार्दन दांडगे.
याबाबत बोलतांना भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष जनार्दन दांडगे म्हणाले, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गलथान कारभारामुळे शवविच्छेदन (Postmortem)अभावी वीस महिन्याच्या मुलाच्या मृतदेहाची सात तासाहूनही अधिक काळ हेळसांड होणे ही बाब अतिशय दुर्देवी व आरोग्य खात्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर मांडणारी आहे. (Uruli Kanchan News) उरुळी कांचन येथे लाखो रुपये खर्चून शवविच्छेदन उभारले असतांना, लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्या दोन उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेला फायदा होत नसेल तर ही बाब अतीशय चुकीची आहे. या प्रकऱणात सखोल चौकशी करण्याबरोबरच, प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकारी व त्यांना पाठीशी घालणारे तालुका आरोग्य अधिकारी अशा तिघांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्याकडे लेखी स्वरुपात करण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan | उरुळी कांचन येथे पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात हळहळ…