Pimpri Crime : पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास गोळीबार करून एकाचा खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तसेच या खुनामुळे पिंपरी चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र पोलिसांना याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या खूनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळच्या मित्रानेच घात केला जात आहे.(Shocking! It was a friend who killed Sonya Tapkir in Pimpri)
पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील मंदिराजवळ कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २० वर्ष) याचा भरदुपारी गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्याच्यावर गोळी चालवणाऱ्या आरोपीचे नाव सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मोई, खेड) असून त्याचा साथीदार सिद्धार्थ कांबळे असल्याचे समोर आले आहे. (Pimpri Crime ) अचानक घडलेल्या घटनेने चिखली परिसरात नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही
दरम्यान खून केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकेवर काढू लागली आहे. (Pimpri Crime ) पोलिस प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
साधारण गेल्या महिनाभरातली ही खुनाची तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी शिरगाव येथील सरपंचाचा भर चौकात खून करण्यात आला होता. त्यानंतर तळेगाव येथे जनसेवा समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा देखील दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. (Pimpri Crime )
गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याची चर्चा असतानाच आता भरचौकात तरुणावर गोळीबार करून खून करण्यात आला आहे. (Pimpri Crime ) त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील वातावरण दहशतमय होऊ लागल्याची चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
pimpri crime : पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास