Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील धक्कादायक प्रकार! उभ्या रिक्षातच तरुणाने घेतला गळफास; स्वतःच्याच शर्टचा गळफास घेण्यासाठी वापर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 17:08

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने स्वतःच्या ऑटो रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत रिक्षाचालकाचे नाव प्रमोद साळुंखे (वय अंदाजे ३२) असे असून, ते चाकणमधील आंबेठाण परिसरातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील सुखवानी हेरिटेज इमारतीसमोर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या सुमारास रिक्षामध्ये संशयास्पद अवस्थेत व्यक्ती दिसताच नागरिकांनी तातडीने निगडी पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा केला असता, प्रमोद साळुंखे यांनी स्वतःच्या शर्टाच्या सहाय्याने रिक्षामध्ये गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

दरम्यान, प्रमोद साळुंखे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

Monday, 17 August 2026, 16:59

पुण्यात धावत्या बसमध्येच प्रवाशासोबत घडलं भयंकर! क्षणात खाली कोसळला अन् १५ मिनिटांचा थरार….

Monday, 17 August 2026, 16:57

आलेगाव पागाच्या कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

Monday, 17 August 2026, 16:52

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘विकसित भारत’ थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

Monday, 17 August 2026, 16:47

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07
Next Post

भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! श्री एकविरा देवी मंदिर ३ दिवस दर्शनासाठी बंद...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.