Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेरा शेठ हमारा पैसा कब देनेवाला है, अशी विचारणा करत मालकाने पैसे बुडवल्याच्या रागातून त्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने रात्रभर खोलीत डांबून, त्यांना नग्न करत बांबू आणि झाडूने मारत रात्रभर नाचवले. एवढ्यावरच न थांबता त्यांना मच्छर मारायच्या बॅटने करंट देण्यात आला. या छळापासून वाचण्यासाठी कामगारांनी इमारतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एका कामगाराचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरात नुकताच उघडकीस आला आहे.
पळून जाण्याच्या प्रयत्नात एका कामगाराचा मृत्यू
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी कामगार गुफरान जाऊद्दीन खान याने छळणूक करणाऱ्या टोळक्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुफरान जाऊद्दीन खान (वय १९, रा. त्रिमूर्ती चौक, आंबेगाव पठार) हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, मागील ३ महिन्यांपासून तो कामानिमित्त नातेवाईकांकडे आला आहे. त्याच्या नातेवाईकाने फिर्यादी खान याला करीम खान यांच्या नुराणी केटरर्स, आंबेगाव पठार, त्रिमूर्ती चौक येथे बिर्याणी बनवण्यासाठी कामाला लावले होते. (Pune News) कामावरील फिर्यादीचा सहकारी लाल मोहम्मद खान हे दोघे केटरिंगच्या गाळ्यातच झोपायचे, तर त्यांचे मालक करीम खान त्यांच्या कुटुंबासोबत गाळा असलेल्या बिल्डिंगमध्ये राहतात. लाल महम्मद खान याने स्वतःचे बिर्याणीचे दुकान टाकले होते. तो अधून-मधून येथील दुकानावर येऊन काम करत असे.
फिर्यादीचे शेठ करीम खान यांनी त्याला सांगितले की, मी मुंबईला चाललो असून, उद्या परत येईन. कोणी विचारल्यास शेठ मुंबईला गेल्याचे सांग. त्यादिवशी दिवसभर फिर्यादीने बिर्याणी विकली. रात्री ११ च्या दरम्यान राकेश खोपडे फिर्यादीकडे आला.(Pune News) तुम्हारा शेठ किधर है, अशी विचारणा केली. त्यावर करीम शेठ मुंबई गये है. कल सुबह आ जायेंगे, असे सांगितले. त्यावर राकेश म्हणाला की, तुमचा शेठ पळून गेला आहे, तो माझे ३ लाख ५० हजार रुपये देणार होता. जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत तुला आणि लाल मोहम्मद दोघांनाही माझ्यासोबत राहावे लागेल असे सांगून तो दोघांना सोबत घेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये गेला.
तेथे पुन्हा राकेशच्या मुलांनी, दादागिरी केली. आम्ही दोघे फक्त कामगार आहोत. आम्हाला या प्रकरणात ओढू नका, असे फिर्यादी याने सांगितले. त्यावर राकेश खोपडे व त्याच्या मुलांनी दोघांना बेदम मारहाण केली. एका बिल्डिंगमध्ये नेऊन, दोघांचे फोन काढून घेतले. बाहेरून खोली बंद केली. थोड्या वेळाने सात-आठ जणांनी मिळून खान याला कोपऱ्यात बसायला सांगितले. आठ जणांपैकी एकाने लाल मोहम्मदला त्याचे कपडे काढण्यास सांगितले. (Pune News) त्यावर लालने कपडे काढण्यास नकार दिला. त्याला बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडले. लालने कपडे काढल्यानंतर टोळक्याने मोबाईलवर गाणे लावले आणि त्याला बांबूने, हाताने, झाडूने मारहाण करत नाचायला लावले. मच्छर मारायच्या बॅटने चटके दिले. थोड्या वेळाने फिर्यादी खान यालाही कपडे उतरून नाचायला सांगितले. त्यालाही झाडूने, बांबूने मारहाण केली. पैसे मिळत नाही तोपर्यंत असेच चालेल असे म्हणत, पहाटे ६ वाजेपर्यंत दोघांना मारहाण केली. सकाळी राकेश खोपडेच्या मुलाने लालला त्याचा मोबाईल देऊन करीम खानला फोन करायला सांगितले आणि साडेनऊपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर दोघांना ठार मारू असे करीमला सांगण्यास सांगितले.
दरम्यान, टोळक्याच्या छळामुळे घाबरलेल्या कामगाराने पळून जाण्याच्या प्रयत्नात इमारतीवरून खाली उडी मारली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. (Pune News) या प्रकरणी फिर्यादी खान याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विविध कलमांन्वये टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भाजप नेत्याच्या मदतीनेच ललित पाटीलने पलायन केले; आमदार रविंद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा
Pune News : फ्लॅटवर जागामालकाचे अतिक्रमण; बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल