Pune News : पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमीनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयात दोन गटात तुफान राडा झाला आहे. आरोपींनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला. (Pune News)
या वेळी एका शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींवर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे. (Pune News)
धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं दालन असलेल्या पाचव्या मजल्यावरच दोन गटांत हाणामारी झाली. सुदैवाने यात जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. वाडेबोल्हाई येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना ही मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षकाराच्या वकिलाने दमदाटी करून मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. तर तर स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा वकिलांनी केला आहे. (Pune News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाईच्या दोन शेतकऱ्यांचे गट संपत्तीच्या वादावरील सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांचं दालन असलेल्या पाचव्या मजल्यावर दोन्ही गटांच्या वादाची सुनावणी सुरू होती. त्याचवेळी दोन्ही गटात अचानक शिवीगाळ सुरू झाली. (Pune News)
किरकोळ वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं. दोन्ही गटातील शेतकऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करत जिल्हाधिकाऱ्यांचं दालन असलेल्या मजल्यावरच जोरदार गोंधळ घातला. आरोपींच्या मारहाणीत एका शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. राजेंद्र दिनकर चव्हाण असं जखमी शेतकऱ्याचं नाव असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Pune News)
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या असते. महत्त्वाच्या व्यक्ती, नेते देखील अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. त्यामुळं थेट जिल्हाधिकाऱ्यांचं दालन असलेल्या मजल्यावर हाणामारीची घटना समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कडक सुरक्षाव्यवस्था असताना देखील हाणामारीची घटना कशी काय घडली?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपींवर पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. (Pune News)
सरकारी ऑफिसमध्ये असा प्रकार घडणं म्हणजे लाजीरवाणं आहे. तर हा वाद सोडवण्यासाठी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. जमिनीच्या कागदपत्रांबाबत कामासाठी शेतकरी कार्यालयात आला असताना हा प्रकार घडला आहे. पोलीस काय करावाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Pune News)