Pimpri News : पिंपरी-चिंचवड : सायबर गुन्हेगार दर काही महिन्यात फसवणुकीसाठी नवे नवे फंडे आणतात. मागील महिना ते दोन महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी टास्क फ्रॉड हा प्रकार आणला आहे. यामध्ये ऑनलाइन लिंकद्वारे एखादे काम दिले जाते. त्यामध्ये चित्रपट रेटींग, चित्रपट समीक्षण, टायपिंग करणे, लाईक, कॉमेंट करणे असे काही काम दिले जाते. याद्वारे ऑनलाइन फसवणूक केली जाते असाच एक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे.
वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास पैसे मिळतील असे आमिष दाखवून प्रीपेड टास्क पूर्ण करताना काहीतरी चूक झाल्याचे सांगत महिलेकडून तब्बल 87 लाख 84 हजार 733 रुपये घेत फसवणूक केली. (Pimpri News )हा प्रकार 24 एप्रिल ते 20 मे या कालावधीत वाकड येथे घडला. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 62895425786900 क्रमांक धारक युनायटेड ह्युमन रिसर्च विभागाचा एच आर बेला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत संपर्क करून त्यांना व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास पैसे मिळतील असे सांगितले. आरोपीने फिर्यादीला सुरुवातीला अल्प परतावा दिला. त्यानंतर विश्वास संपादन करून टेलिग्रामवर संपर्क करत प्रीपेड टास्क देत टास्कची पूर्तता करताना काहीतरी चूक झाली आहे ती दुरुस्त करण्यासाठी विविध कारणे सांगितली. (Pimpri News ) क्रेडीट स्कोर अपडेट करण्यासाठी, व्हीआयपी कस्टमर अपग्रेडेशन, खाते एक्टिव्ह करण्यासाठी पैसे भरावे लागतील, अशी कारणे आरोपीने सांगितली. जर पैसे भरले नाहीतर तर अगोदरचे पैसे बुडतील अशी भीती दाखवून तब्बल 87 लाख 84 हजार 733 रुपये विविध बँक खात्यांवर घेऊन महिलेची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
Pimpri News : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीची तब्बल 14 लाखाची फसवणूक
Pimpri News : आधी आईला केला ‘तो’ फोन नंतर तरुणाने घेतला गळफास