पिंपरी: कामाच्या शोधात लातूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune News) आलेल्या दोन मित्रांमधील ‘जेवण कोणी बनवायचे?’ हा साधा वाद इतक्या टोकाला जाईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. मोशीतील हवालदार वस्ती परिसरात बुधवारी एका तरुणाची गॅस सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

बालाजी खंडारे (32) आणि प्रदीप गुंडरे (29) हे दोघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी होते. रोजगारासाठी पुण्यात स्थायिक झालेले हे मित्र एकत्र राहत होते. बुधवारी संध्याकाळी दोघांमध्ये जेवण बनविण्यावरून बाचाबाची झाली.
मात्र, रागाच्या भरात प्रदीपने घरातील गॅस सिलिंडर उचलून थेट बालाजीच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी प्रदीपला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.







