Pune News | पुणे : वाहतूक पोलीस फक्त सर्वसामान्य लोकांवरच कारवाई करतात म्हणून अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र वाहतूक पोलिसांनी आता सर्वसामान्य लोकांसोबतच स्वतःला व्हीआयपी किंवा विशेष म्हणून घेणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे.
पुण्यात वाहतूक पोलिसांनी आता सर्वसामान्य लोकांसोबतच स्वतःला व्हीआयपी किंवा विशेष म्हणून घेणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. यामध्ये गाड्यांवर पोलीस नाव असणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पोलीस, शासकीय सेवेतील अधिकारी, पी एम पी एम एल, एडव्होकेट / डॉक्टर, सैन्यदल, मीडिया, प्रेस, असे गाडीवर लिहिणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे.
डॉक्टर सैन्य दलातील अधिकारी, शासकीय सेवेतील कर्मचारी यांच्यासह काही पोलिसांचा देखील समावेश….
वाहतूक पोलिसांनी या संदर्भातली मागील पंधरा दिवसातली आकडेवारीच जाहीर केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या आकडेवारी सर्वाधिक कारवाई ही पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे. या आकडेवारीतून वाहतूक पोलीस हे फक्त सर्वसामान्य लोकांनाच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक नागरिकावर कारवाई करतात हे दिसून येते.
मागील पंधरा दिवसात कारवाई करण्यात आलेली आकडेवारी-
मागील १५ दिवसातील चलन कारवाया…
पोलीस – ३९२
शासकीय सेवेतील अधिकारी – १६०
पी एम पी एम एल – ३०
एडव्होकेट / डॉक्टर – १५१
सैन्यदल – ३५
मीडिया, प्रेस – २७
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Suicide | सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून केली आत्महत्या..!