Pune news : पुणे : भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनीचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह तिघांवर ११ कोटी २३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अधिकार नसतानाही कोट्यवधी रुपयांचा अपहार करुन, एकूण ६२ दुकाने, ऑफिसेस वैयक्तिक फायद्यासाठी स्वत:च्या स्पेक्ट्रम भागीदारी संस्थेच्या नावे ११ वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करुन, घोर फसवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे.
भोसरी पोलिसांची कारवाई
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रदीप पोपटलाल कर्नावट (वय ५३, रा. शिवाजी पार्क, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Pune news ) त्यानुसार पोलिसांनी प्रशांत मणिलाल संघवी (वय ५५, रा. मणिभवन, आदर्शनगर, जळगाव), संदेश मिश्रीलाल चोपडा (वय ५४, रा. बळीराम पेठ, जळगाव) आणि प्रमोद भाईचंद रायसोनी (रा. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भोसरीतील प्रसन्न गोल्डफिल्डच्या कार्यालयात २४ मे २०२३ रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सेक्टर नंबर ११, प्लॉट नं. १ येथील एकूण ४४०० चौरस मीटर क्षेत्रावर पी ३ डेव्हलपर्स भागीदारी संस्थेच्या वतीने ६२ दुकाने, कार्यालये बांधण्यात आली आहेत. फिर्यादींनी काही जणांकडून आगाऊ पैसे घेऊन त्यांची विक्री केली आहे. आरोपींनी २३ मे रोजी ११ वेगवेगळ्या दस्तांद्वारे करारनामा करुन, एकूण ६२ दुकाने स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केली आहेत.
दरम्यान, फिर्यादी यांनी त्यामध्ये मेहता, कासवा, पटेल यांना विक्री केलेल्या १६ दुकानांचा समावेश आहे. कोणतेही अधिकार नसताना आरोपींनी सुमारे ११ कोटी २३ लाख २० हजार रुपयांचे अपहार करुन, ६२ दुकाने, ऑफिसेस फायद्यासाठी स्वत:च्या स्पेक्ट्रम भागीदारी संस्थेच्या नावे ११ वेगवेगळ्या दस्तांद्वारे करारनामा करुन घोर फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.(Pune news ) त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीकडून ९६ जादा गाड्या सोडणार…
Pune News : सिंहगडावर जाण्यासाठी आता तिकीटासाठी रांग लावायची गरज नाही