Pune Municipal Corporation | पुणे : महापालिकेकडून शहरात विकासाच्या नावाखाली पर्यावरण तसेच जैवविविधतेचे कधीही न भरून येणारे नुकसान केले जात आहे, असा आरोप केला जात आहे. तसेच
याचा निषेध म्हणून शहरातील पर्यावरण अभ्यासकांनी “माझी वसुंधरा’ उपक्रमा अंतर्गत देण्यात आलेले पर्यावरणदूत पुरस्कार परत केले आहेत.
महापालिकेने 31 मार्च रोजी 24 अभ्यासक आणि नागरिकांना पर्यावरणदूत पुरस्कार दिले होते. त्यातील, 11 अभ्यासकांनी हे पुरस्कार सोमवारी परत केले. पर्यावरण अभ्यास अमिताब मल्लिक, शैलजा देशपांडे, रणजीत गाडगीळ, सत्या नारायण, डॉ. गुरूदास नूलकर, अनंत घरत, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, मुकूंद मालवणकर, वैशाली पाटकर यावेळी उपस्थित होते.
एका बाजूला आम्हाला पुरस्कार दिले जात असताना पालिका झाडे तोडण्याची तसेच टेकड्या फोडण्याची कामे करत आहे. त्यामुळे महापालिकेस हा पुरस्कार परत करत असल्याचे या अभ्यासकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर, महापालिका आयुक्त कार्यालयात जाऊन या अभ्यासकांनी हे पुरस्कार परत केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri News | भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू
Pimpri Crime : व्हिडीओ लाईक करणे तरुणाला पडले नऊ लाखांना ; दुप्पट रक्कम मिळण्याच्या आमिषाचा ठरला बळी