Pimpri News : पिंपरी-चिंचवड : कायमस्वरूपी काम देण्याच्या बहाण्याने ओळख वाढवून आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार चिखली येथून समोर आला. याप्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मार्च 2023 ते 12 जून 2023 या कालावधीत चिखली येथे घडला. (Woman raped by lure of job; two were arrested)
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली
याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलीसांनी शशिकांत कदम, रमेश गोपीनाथ सुरवसे (दोघे. चिखली) दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कदम याने कायमस्वरूपी काम देण्याच्या बहाण्याने फिर्यादीशी ओळख वाढविली. मोबाईल नंबर घेऊन वारंवार संपर्क साधला. व्हिडीओ कॉल केले. (Pimpri News) कॉल रेकॉर्ड केले. रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. व्हिडीओचा फायदा घेत त्याचा मित्र आरोपी रमेश यानेही अत्याचार केले. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : रहाटणी येथे छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Pimpri News : खुनाचे सत्र सुरुच मोशीमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून
Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद