Pimpri News : पिंपरी-चिंचवड : शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरीचा नवीन फंडा वापरत एका तरुणाला तब्बल 39 लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे. सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर आपले जाळे तयार केले असून विविध प्रलोभने देऊन लोकांना टार्गेट करीत आहेत. हा सर्व प्रकार आभासी आणि ऑनलाइन सुरू आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
टास्क पूर्ण करण्याचे काम देऊन त्यात पैसे गुंतविल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो, असे सांगून टेलिग्राम या सोशल मीडियाचा वापर करून सायबर गुन्हेगाराने अनेकांची फसवणूक केली आहे. (Pimpri News) असाच एक प्रकार समोर आला आहे. प्रीपेड टास्क करून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या अमिषातून तरुणाला 39 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 27 एप्रिल ते 17 मे या कालावधीत पिंपळे सौदागर येथे ऑनलाइन पद्धतीने घडला.
याप्रकरणी साई संतोष व्यंकटरमना वुन्ना (वय 30 राहणार पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी(दि.26) तक्रार दिली असून (Pimpri News) अनोळखी महिला मीना व टेलिग्राम आयडी वरील रमा या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधत रमा हिने @Rama 1709, arm worldwide Mission Group टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करत वेगवेगळे प्रीपेड टास्क देत (Pimpri News) बँक खात्यावरील रक्कम घेत मुद्दल व कोणताही परतावा न देता तब्बल 39 लाख 15 हजार 415 रुपयांची फसवणूक केली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : जेसीबी ऑपरेटरला मारहाण करत लुटले
Pimpri News : धक्कादायक! 62 वर्षीय वृद्धाकडून 9 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण