Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली भागात सचिन हार्डवेअरच्या दुकानाला आज पहाटे भीषण आग लागली. अवघं चौधरी कुटुंब या दुकानात वास्तव्याला होते. अचानक आग लागल्याने झोपेत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी चौधरी कुटुंब काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. ही ट्रिप त्यांची अखेरची ट्रिप ठरेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते…
चौधरी कुटुंब मूळचे राजस्थान येथील असून, दीड वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये हार्डवेअरचा व्यवसाय करत होते. याच दुकानात हे कुटुंब वास्तव्याला होते. चिमणराव चौधरी आणि नम्रता चिमणराव चौधरी हे पती-पत्नी, मुलगा भावेश (वय १५) आणि सचिन (वय १३) यांच्यासह राहत होते. (Pimpri News) परंतु, आज पहाटे हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली आणि या आगीत एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांची काश्मीर ट्रिप अखेरची ठरल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आगीच्या तीव्रतेमुळे बाहेर पडणे झाले अशक्य
दुकानात तयार केलेल्या माळ्यावर चौधरी कुटुंब राहत होत. आज पहाटे अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. तेव्हा कुटुंबातील तीन जणांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुकानात पेंट्ससह केमिकल असल्याने आग तीव्र झाली. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही. (Pimpri News) चारही जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहेत. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भोसरीच्या सीमा बेलापूरकर यांची मनसेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड