Pimpri News : पिंपरी : अपघातात ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे अवयवदान करण्यात आले आहे. हे अवयव सात जणांवर प्रत्यारोपण केल्याने त्यांना नवीन जीवन मिळाले आहे. तर लोहाडे दाम्पत्याचा घेतलेल्या या आदर्शवत निर्णयाचे सर्व स्तरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
लोहाडे दाम्पत्याच्या आदर्शवत निर्णयाचे होतेय कौतुक
अक्षत सचिन लोहाडे (१४), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अक्षत याचे वडील सचिन लोहाडे हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत, तर आई सुवर्णा ही विमा प्रतिनिधी आहे. (Pimpri News) मोठी बहीण विधी हिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अक्षत हा इयत्ता नववीत शिकत होता.
मूळचे औरंगाबाद येथील असलेले सचिन लोहाडे काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आले. कुटुंबासह ते शाहूनगर येथे वास्तव्यास आहेत. मुलगा अक्षत याला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड होती.
दरम्यान, अक्षत आणि त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात दुचाकीचालक मित्राचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला अक्षत गंभीर जखमी झाला. (Pimpri News) त्याला रुग्णालयात दाखल केले.अक्षतची सात दिवस उपचारांची शर्थ झाली. मात्र, मेंदू निकामी (ब्रेन डेड) होऊन अक्षतचा मृत्यू झाला.
अक्षतचे अवयवदान केल्यास समाजाला मोठा संदेश देता येईल. काही जणांचे आयुष्य बचावू शकते, तसेच काही जणांना अपंगत्वावर मात करता येईल, असे सांगत मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. अमित पांडे यांनी समुपदेशन केले. त्यानंतर अक्षतचे अवयव दान करण्याचा आई- वडिलांनी निर्णय घेतला. (Pimpri News) त्यानुसार रविवारी सकाळी अवयवदान करण्यात आले.
राखी बांधायची कोणाला
‘ब्रेनडेड’ अवस्थेत असताना अक्षतला बहीण विधी हिने राखी बांधली. लाडक्या भावाला दरवर्षी मोठ्या आनंदात राखी बांधत होती. मात्र, यंदा रक्षाबंधनला मोठे दु:ख ओढावले. यापुढे कोणाला राखी बांधायची, असे म्हणत बहीण विधीने दु:ख व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
pimpri News : इंदापुरच्या ऋषिकेश अरणकल्ले यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान