Pimpri News : पिंपरी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने शनिवारी (ता. ४) ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई-पुणे हमरस्ता, चिंचवड येथे दुपारी ४ वाजता ‘श्यामची आई’ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा
ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तसेच टाटा मोटर्स उद्योगसमूहाचे मनोहर पारळकर आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात रहाटणी येथील भिकोबा तांबे मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक गणेश काळे यांना (श्याम) आणि त्यांच्या मातोश्री द्रौपदाबाई शंकरराव काळे यांना (श्यामची आई) पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.(Pimpri News) त्याचबरोबर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर (साने गुरुजी विचारसाधना पुरस्कार), वि. दा. पिंगळे, सुनीता पवार, सायली संत (साने गुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्कार) यांना तसेच चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल या शाळेला (साने गुरुजी संस्कारक्षम शाळा पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरीच्या रहाटणी येथील राम मंदिरात महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा स्थापन
Pimpri News : माणसाइतके पवित्र दुसरे काही नाही : उद्धव कानडे
Pimpri News : भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांच्या हाती ठाकरे गटाचे शिवबंधन